सुनील पवार शिवसेनेच्या माणगाव शहरप्रमुखपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील पवार शिवसेनेच्या माणगाव शहरप्रमुखपदी
सुनील पवार शिवसेनेच्या माणगाव शहरप्रमुखपदी

सुनील पवार शिवसेनेच्या माणगाव शहरप्रमुखपदी

sakal_logo
By

माणगाव (वार्ताहर) : शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि ॲड. राजीव साबळे यांचे कट्टर समर्थक युवा सेना नेते सुनील पवार यांची माणगाव शहरप्रमुखपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड शनिवारी (ता. ६) माणगाव येथे झालेल्या सभेत करण्यात आली. पवार हे सामाजिक कार्यकर्ते असून ते बेलदार समाजाचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आहेत. त्यांनी ॲड. राजीव साबळे यांच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, नळजोडण्या, विहिरी, गटारे, वीजपुरवठा, व्यायामशाळा, बालवाडी, स्वयंरोजगार आदी विकास योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. सभेला जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, शिंदे सेना नेते ॲड. राजीव साबळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92170 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..