वसई विरारला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरारला पावसाने झोडपले
वसई विरारला पावसाने झोडपले

वसई विरारला पावसाने झोडपले

sakal_logo
By

वसई, ता. ९ (बातमीदार) : वसई तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून मुसळधार पावसामुळे चाकरमानी वर्गाची तारांबळ उडाली होती. वसईत एका इमारतीवर तसेच विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, वसई तालुक्यात सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने महापालिका आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. मुख्य मार्ग वाहतूक कोंडीत सापडल्‍याने वाहनांच्या लांबच लांब रांगा वसई औद्योगिक मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर लागल्या होत्या. वाहतूक विभागाकडून वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्न केले जात होते. काही ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या. वारा जास्त वेगाने असल्याने वीजपुरवठा काही वेळाकरिता खंडित करण्यात आला होता. काही काळानंतर वीज विभागाने तो सुरळीत केला.
वसई तालुक्यातील चांदीप, उसगाव, वसई, विरार, नालासोपारा भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सातिवली तुंगारफाटा येथे बिस्तरी केशव पांढरा या आदिवासी महिलेच्या घरावर झाड कोसळले. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नसली तरी दोन गाळे व घरांचे नुकसान झाले. वसईला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झाड कोसळले. त्यामुळे पत्र्याचे नुकसान झाले.
-----------------------------
पाणी साचले मात्र त्वरित निचरा
वसई-विरार शहरात रस्त्यांवर पाणी साचले. काहीकाळ नागरिकांची तारांबळ उडाली; मात्र, पाण्याचा निचरा झाल्याने वाहतुकीचे मार्ग मोकळे झाले
-----------------------------
झाडे उन्मळली
वसई-विरार शहर व ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वसई पश्चिमेला वसंत मंदिर येथील इमारतीवर तर तुंगारफाटा येथे एका महिलेच्या घरावर झाड कोसळले. शिरसाड येथे रस्त्यावर झाड पडले. तसेच, शहरात विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच यंत्रणेसह धाव घेत मदतकार्य सुरू केले.
-----------------------------
वसई विरार पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याने वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवन पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांटवर परिणाम झाला असून, त्यामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पुढे दोन दिवस अनियमित व कमी दाबाने पाणी वितरित करण्यात येणार आहे.
----------------------------
शेतकरी समाधानी
काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे भातशेतीला पाणी मिळत नव्हते. अशातच पिके करपण्याची व आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार, अशी भीती निर्माण झाली असतानाच पावसाने आगमन केल्याने शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही भागातील रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत तर पावसामुळे खड्डे बुजविण्यास अडचण निर्माण होत आहे. लवकरात लवकर वसई-विरार शहरात प्रशासनाकडून काम हाती घेण्यात येणार आहे.
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92175 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..