महामार्गावर ट्रकला लक्झरीची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर ट्रकला लक्झरीची धडक
महामार्गावर ट्रकला लक्झरीची धडक

महामार्गावर ट्रकला लक्झरीची धडक

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावर ट्रक-लक्झरीच्‍या धडकेत लक्झरी बसमधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे; तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्‍याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चारोटी उड्डाणपुलावर एक नादुरुस्त ट्रक उभा होता. पाठीमागून भरधाव येणाऱ्या लक्झरी चालकाने उभ्या नादुरुस्त ट्रकला धडक दिली. या धडकेत लक्झरी चालकाचे दोन्ही पाय अपघातग्रस्‍त झाले होते. यामुळे घटनास्‍थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चारोटी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त ट्रक व लक्झरी यांना बाजूला करण्याचे काम सुरू केले. गंभीर जखमी वाहनचालक व प्रवाशांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92178 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..