स्वामी मुक्तानंद हायस्कूलची तिरंगा रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची तिरंगा रॅली
स्वामी मुक्तानंद हायस्कूलची तिरंगा रॅली

स्वामी मुक्तानंद हायस्कूलची तिरंगा रॅली

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलने हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी चेंबूर परिसरात प्रभातफेरी काढली. चेंबूरमधील आचार्य कॉलेज मार्ग, घाटला व्हिलेज व सुभाषनगर परिसरात विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत देशभक्तीच्या घोषणा देत लेझीम व बॅड पथकाने परिसर दुमदुमला होता. शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तिरंगा रॅलीमध्ये दोनशे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हर जान में तिरंगा हर घर तिरंगा, सारे जहाँ से प्यारा हमे तिरंगा हमारा, तिरंगे की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे, हम सबका एकही नारा है तिरंगा हम सबको प्यारा है यासह अनेक घोषणा देत चेंबूरमधील परिसर दणाणून सोडला होता. रॅलीनंतर शाळेचे उपमुख्याध्यापक आप्पासाहेब शेळके व पर्यवेक्षक शुभांगी नाईक यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92184 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..