वाशीत व्यसनी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीत व्यसनी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
वाशीत व्यसनी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वाशीत व्यसनी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : वाशीतील जुहूगावात राहणाऱ्या शंकर भागू लोहेट (वय ३८) या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. दारूच्या व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेतील मृत शंकर हा वाशीतील जुहूगावात पत्नी व मुलासह राहत होता. शंकरला दारूचे व्यसन जडल्याने तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यामुळे तो कायम घरीच दारूच्या नशेत राहत होता. शंकरचे व्यसन सुटावे यासाठी त्याच्या पत्नीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रातदेखील पाठवले होते; मात्र त्यानंतरदेखील त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्यामुळे महिनाभरापूर्वीच शंकरला व्यसनमुक्ती केंद्रातून घरी आणण्यात आले होते. त्यानंतरदेखील तो कायम नशेत राहत होता. सोमवारी सकाळी शंकरची पत्नी कामाला; तर त्याचा मुलगा शाळेत गेला असताना घरामध्ये एकटाच असलेल्या शंकरने दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्याचा मुलगा घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92186 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..