आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक
आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक

sakal_logo
By

आदिवासींच्या कल्याणासाठी कटिबद्ध ः गणेश नाईक
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीला घरे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाशीत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबई शहरात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी आदिवासी बंधवांनी रॅली काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले.
जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. नवी मुंबईत ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मंगळवारी ता (९) कोपरखैरणे येथून निघालेल्या रॅलीचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून जनजागृती केली. या रॅलीचा समारोप विष्णुदास भावे सभागृहात करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक रमेश डोळे, राजश्री कातकरी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. आदिवासी सांस्कृतिक पथकांचा सन्मानचिन्ह देऊन गौराव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92188 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..