अंबर भरारीकडुन अंबरनाथला ११ हजार तिरंगा झेंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबर भरारीकडुन अंबरनाथला  ११ हजार तिरंगा झेंडे
अंबर भरारीकडुन अंबरनाथला ११ हजार तिरंगा झेंडे

अंबर भरारीकडुन अंबरनाथला ११ हजार तिरंगा झेंडे

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ९ (बातमीदार) : हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अंबर भरारी सामाजिक संस्थेतर्फे ११ हजार तिरंगा झेंडे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि गुणवंत खेरोडिया यांच्या नेतृत्वाखाली निखिल चौधरी यांनी शहरातील शैक्षणिक संस्था, कार्यालये तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये तिरंगा झेंडा देऊन तिरंगा अंबरनाथ करण्याचा संकल्प केला आहे. अंबरनाथच्या रोटरी इनरव्हील शाळेमध्ये झेंडे देऊन निखिल चौधरी यांनी घर घर तिरंगा अभियानाला सुरुवात केली.
माजी नगरसेवक सुभाष साळुंके आणि संवाद फौंडेशनच्या सुवर्णा साळुंके यांच्या वतीने शिवाजीनगर, ताडवाडी परिसरात एक हजार शासकीय तिरंगा ध्वज मोफत वाटण्यात येणार आहेत. शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी शिवसंवाद संपर्क कार्यालयात साधण्याचे आवाहन साळुंके यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलिस उपायुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते, आयटीआयचे प्राचार्य अजित शिंदे यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगाबाबत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या वेळी आयटीआयमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92200 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..