केदार दिघेंचा जबाब नोंदवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केदार दिघेंचा जबाब नोंदवला
केदार दिघेंचा जबाब नोंदवला

केदार दिघेंचा जबाब नोंदवला

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार आणि धमकीप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला. केदार हे सोमवारी सकाळी आपल्या वकिलासह पोलिस ठाण्यात आले. आपल्या निवेदनात त्यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचे नाकारले. दिल्लीतील व्यावसायिक रोहित कपूरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. केदार यांनी महिलेला तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची वाच्यता न करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रोहित कपूर याच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्यासाठी ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली होती. धमकीच्या आरोपात केदार दिघे यांचेही नाव गुन्ह्यात नोंदवले असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. या प्रकरणात बलात्काराचा गुन्हाही दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92210 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..