आदिवासींच्या विकासासाठी ११ हजार १९९ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासींच्या विकासासाठी ११ हजार १९९ कोटी
आदिवासींच्या विकासासाठी ११ हजार १९९ कोटी

आदिवासींच्या विकासासाठी ११ हजार १९९ कोटी

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना संबोधित केले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच जिल्ह्यातील आदिवासी बांधव या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशात प्रथमच सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत, ही बाब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन दुर्बल घटकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध काम करत आहे. राज्यात १ कोटी ५ लाख आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत आहे. आदिवासी समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी स्वातंत्र्य जनजाती क्षेत्र उपाययोजना राबवण्यात येत आहे. या उपाययोजनामध्ये राज्यातील १६ जिल्हे, ६८ तालुके, ६ हजार २६२ गावांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
...
स्पर्धा परीक्षांसाठी साह्य
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजनेच्या माध्यमातून जवळपास २१ हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनामार्फत अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आदिवासी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथे खासगी संस्थांच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92213 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..