स्वातंत्र्यदिनापासून "ऑपरेशन रि युनाईट" प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यदिनापासून "ऑपरेशन रि युनाईट" प्रारंभ
स्वातंत्र्यदिनापासून "ऑपरेशन रि युनाईट" प्रारंभ

स्वातंत्र्यदिनापासून "ऑपरेशन रि युनाईट" प्रारंभ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्याचा उपक्रम देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मुंबई पोलिस सुरू करणार आहेत. मुंबई शहरामधून हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई पोलिसांतर्फे ‘ऑपरेशन रीयुनाईट ही मोहीम राबवण्यात येत आहे.
या कालावधीमध्ये मुंबई शहरातून १८ वर्षांखालील बेपत्ता झालेली अथवा अपहरण केलेली जास्तीत जास्त बालके शोधून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यासाठी मुंबई पोलिस विशेष ऑपरेशन करणार आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुंबईमधील नागरिकांनी विविध अशासकीय संस्थांना मदत केल्यास जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये तसेच रस्त्यावर राहणारी, रेल्वे स्थानक, बस डेपो आणि रस्त्यावर भीक मागणारी आणि भंगार गोळा करण्याचे काम करणारी मुले आढळल्यास हेल्पलाईन क्रमांक १०० किंवा १०९८ फोन करून मुंबई पोलिसांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92214 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..