विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी-पेन्सील हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी-पेन्सील हद्दपार
विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी-पेन्सील हद्दपार

विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाटी-पेन्सील हद्दपार

sakal_logo
By

जव्हार, ता. १० (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये दशकभरापासून पाटी आणि पेन्सिल ही विद्यार्थ्यांच्या दप्तरातून हद्दपार झाली आहे. पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा श्रीगणेशा पाटी- पेन्सिलनेच होत होता. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाईन शिक्षणाला गती आली आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून, पाटीची जागा मोबाईलने घेतली आहे. यामुळे पालकांच्या खर्चात वाढ झाली आहे.
विद्यार्थ्याचे दप्तर हे पाटी असल्याशिवाय पूर्ण होत नव्हते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालकांची पाटी-पेन्सिल खरेदीसाठी दुकानात गर्दी होत असे. पण आता शिक्षण पद्धती बदलल्याने पाटीची मागणी घटली. त्यामुळे बहुतांश विक्रेत्यांनीही विक्रीसाठी पाट्या ठेवणे बंद केले; तर आता या पाटीची जागा मोबाईल आणि वह्यांनी घेतली आहे. आता वर्षातून किमान एक डझन वह्या विद्यार्थ्यांना त्यामुळे पालकांच्या खर्चातदेखील वाढ झाली आहे.
......

पाटीवर गिरवल्यानंतर पाठांतर चांगले होते. सराव चांगला होतो. अक्षर वळणदार व सुंदर होत होते. लिखाणातील चुकाही कमी होतात. दहा वेळा वाचन करण्यापेक्षा एकदाच पाटीवर लिहिले तरी पाठांतर होत होते. त्यामुळे पाटी ही दप्तरामध्ये महत्त्वाची आहे.
- भीम सिंग वळवी, प्राथमिक शिक्षक

सध्या पाटीऐवजी मराठी शुद्धलेखनाचा सराव करण्यासाठी दोन रेघी वही, तर इंग्रजीचा सराव करण्यासाठी चार रेघी वहीचा वापर केला जातो. शासनाच्या शैक्षणिक धोरणात छडी गायब, नापास कुणी होणार नाही आणि बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये पाटी दिसत नाही.
- विशाखा अहिरे, पालक, जव्हार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92223 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..