सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’

sakal_logo
By

सफाळे, ता. १० (बातमीदार) : विद्यार्थ्यांची भावनिक जडणघडण योग्य प्रकारे करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’ सोनोपंत दांडेकर महाविद्यालय कार्यान्वित करण्यात आला आहे. बदलत्या व गतिमान काळातील भावना व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेऊन महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना भावनांचे योग्य व्यवस्थापन, सुसमायोजन करण्याचे प्रशिक्षण देणे हा प्रज्ञा परिसर प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून ३६ महाविद्यालयांची निवड केली आहे. यात पालघर जिल्ह्यातून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. हे महाविद्यालय पालघर जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांना यासंदर्भात प्रशिक्षित करणार आहे. हे प्रशिक्षण जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यार्थी अशा व्यापक स्तरावर देण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात समन्वय साधण्याचे काम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख व डॉ. तानाजी पोळ करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92226 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..