भिवंडी पालिकेच्यावतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा, हुतत्म्यांना केले अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिकेच्यावतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा, हुतत्म्यांना केले अभिवादन
भिवंडी पालिकेच्यावतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा, हुतत्म्यांना केले अभिवादन

भिवंडी पालिकेच्यावतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा, हुतत्म्यांना केले अभिवादन

sakal_logo
By

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांचे, सहभाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे उपकार फार मोठे आहेत. त्यांच्यामुळे आपण स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या उपक्रमात १३ ते १५ ऑगस्ट या दरम्‍यान सर्वत्र घरोघरी तिरंगा मोहीम राबवून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू या, असे भावपूर्ण उद्गार आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी काढले.
९ ऑगस्ट क्रांतिदिन ही स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात महत्त्वाची घटना आहे. त्यानिमित्ताने स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकास पालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. अमृत महोत्सवी स्‍वातंत्र्य दिनाच्‍या निमित्ताने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी पालिका उपायुक्त दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सामान्य प्रशासन सहायक आयुक्त नितीन पाटील, सहायक आयुक्त प्रीती गाडे, प्रभाग अधिकारी बाळाराम जाधव, फैजल तातली, सुनील भोईर, रमेश थोरात, दिलीप खाने, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे, सर्व विभाग प्रमुख आणि अन्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92232 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..