उपाध्यक्षपदी मोरेश्वर पाटील यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपाध्यक्षपदी मोरेश्वर पाटील यांची निवड
उपाध्यक्षपदी मोरेश्वर पाटील यांची निवड

उपाध्यक्षपदी मोरेश्वर पाटील यांची निवड

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील लाखीवली येथील मोरेश्वर पाटील यांची आगरी सेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे आगरी सेनेचा ३६ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी व आगरी सेना कार्याध्यक्ष प्रदीप भाऊ साळवी यांच्या मार्गदर्शनाने व आगरी सेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष नारायण अंदाडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. तसेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. मोरेश्वर पाटील हे कवी, लेखक, नाटककार, इतिहास संशोधक असून वीट उत्पादक कोकण प्रांताचे संचालक, श्रमिक मंडळ भिवंडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92234 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..