सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीनारायण मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान
श्री लक्ष्मीनारायण मंदिर
सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीनारायण मंदिर

सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान श्री लक्ष्मीनारायण मंदिर

sakal_logo
By

सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान
श्री लक्ष्मीनारायण मंदिर
- पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज पथावर असलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे दोनशेपेक्षा जास्त वर्ष पुरातन आहे. या मंदिरातील श्री लक्ष्मीनारायण इच्छापूर्ती असल्याचे मानले जाते. सीकेपी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
सन १९५३ मध्ये सीकेपी समजाने ट्रस्टची नोंदणी केली. आज मंदिरात समाजाच्या ट्रस्टतर्फे विविध उत्सव साजरे केले जातात. लक्ष्मी-नारायण मंदिरातील श्रीकृष्ण जन्मोत्सव नेहमीच आकर्षण राहिले आहे. या दिवशी मंदिरात शाडूच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पनवेलमधील कुंभार आळीतील एका कुटुंबाला गेल्या ९८ वर्षांपासून मूर्ती बनविण्याचा मान आहे. कालाष्टमीला या मंदिरात दोन हंड्या बांधण्यात येतात. त्यापैकी एक हंडी फोडण्याचा मान हा प्रभू आळीचा आहे. सायंकाळी महाप्रसाद होतो. पूर्वी समाजातील कुटुंबाकडून धान्य गोळा करून महाप्रसाद केला जात असे. आता मात्र संस्था खर्च करते. देवळात गणेशोत्सव, महिलांचे हळदी-कुंकू आणि रामनवमी ही उत्साहाने साजरी केली जाते.

१९३६ मध्ये जीर्णोद्धाराचा दाखला
या पुरातन मंदिराचा १९३६ मध्ये जीर्णोद्धार झाल्याचे पुरावे मिळतात. १९१७ मध्ये पुन्हा या मंदिराचा आणि त्या लगतच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय कायस्थ प्रभू समाजाच्यावतीने घेण्यात आला. कामाला सुरुवात झाल्यावर सुप्रसिद्ध उद्योगपती राजू गुप्ते यांच्या मातोश्री श्रीमती कांता गुप्ते यांनी जीर्णोद्धार करावा, अशी इच्छा प्रकट करताच राजू गुप्ते यांनी स्वखर्चाने श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांनी सपत्निक विधिवत पूजन करून मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा केली. या मंदिरामुळे पनवेलच्या सौंदर्यात भर पडली आहे.
- नितीन देशमुख, पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92238 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..