मतदारयाद्यांतील गोंधळाच्या निषेधार्थ उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारयाद्यांतील गोंधळाच्या निषेधार्थ उपोषण
मतदारयाद्यांतील गोंधळाच्या निषेधार्थ उपोषण

मतदारयाद्यांतील गोंधळाच्या निषेधार्थ उपोषण

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीतील मतदारयाद्यांत झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अंबरनाथला उपोषण सुरू करण्यात आले.

अंबरनाथ नगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग सहा, सातमध्ये मोठ्या प्रमाणात नावांचा घोळ झाला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार, चर्चा करून निवेदने देऊनही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस आणि माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, रेश्मा सुर्वे, कबीर गायकवाड, सुरेश सिंह आदींनी नगरपालिका मुख्यालयासमोर कल्याण- बदलापूर महामार्गाच्या बाजूला आमरण उपोषण सुरू केले आहे. मतदारयाद्या तयार करताना नगरपालिका अधिकाऱ्यांनी जागेवर न जाता चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचे कबीर गायकवाड म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92242 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..