Raksha Bandhan 2022 : बहिणीला भेटवस्तू काय देणार, हे आहेत ७ पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan 2022
भावा-बहिणीच्या नात्याला भेटवस्तूंचा गोडवा

Raksha Bandhan 2022 : भेटवस्तू काय देणार, सात पैकी एक निवडा, बहीण खूश होईल

Raksha Bandhan 2022 Gift Ideas

शिल्पा नरावडे : सकाळ वृत्तसेवा
जुईनगर : भावा-बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन! निःस्वार्थ आणि पवित्र अशा या नात्यामधील असलेले प्रेम, जिव्हाळा या सणातून व्यक्त होता. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते; तर लाडक्या बहिणीला भावाने दिलेली खास भेटवस्तू या सणाचा गोडवा अधिकच अविस्मरणीय करतो.

हेही वाचा: Raksha Bandhan : शास्त्रानुसार राखी बांधताना भावाने या दिशेला तोंड करुन बसावे

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला बहिणीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या अगोदरच बहिणीला कोणती भेटवस्तू द्यायची, ज्यामुळे लाडक्या बहिणीला आनंद होईल, असा संभ्रम नेहमीच पडतो. त्यात कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर यंदा रक्षाबंधनाचा सणही उत्साहात साजरा होणार असल्यामुळे या सणाचा गोडवा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सध्या बाजारात ग्राहकांचा कल लक्षात घेऊन विविध भेटवस्तू दाखल झाल्या असून विविध पर्यांयामुळे सणाचा उत्साह वाढणार आहे. Rakhi Gifts for Sister

हेही वाचा: Raksha Bandhan 2022: सुतक पडलेले असताना रक्षाबंधन करावे का? बघू या काय सांगते शास्त्र

साडी : महिलांना नेहमीच साडीचे आकर्षण असते. त्यामुळे बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या उपलब्ध झाल्या आहेत. सध्या बाजारात अगदी हजार रुपयांपासून महागड्या साड्या उपलब्ध आहेत.
------------------------------
वायरलेस इअरवर्ड्स : गाणी ऐकायची आवड असेल तर वायरलेस इअरवर्ड्सचादेखील चांगला पर्याय आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला वायरलेस इअरवर्ड्स भेटवस्तूचा हा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरेल.
----------------------------------
स्मार्ट घड्याळ : सध्या स्मार्ट घड्याळाचा ट्रेंड खूप वाढला आहे. शिवाय निरोगी आयुष्याचा नवा ट्रेंड असल्याने ही भेटवस्तू अप्रतिम असेल. त्यामुळे रक्षाबंधनाला भेटवस्तू म्हणून स्मार्ट घड्याळाचा देखील पर्याय आहे.
--------------------------------------
स्मार्ट फोन : सध्या बाजारामध्ये नवनवीन मोबाईल्स विक्रीसाठी आलेले आहेत. त्यात कमी बजेटमधील विविध फिचर्स असलेले स्वस्तात मस्त पर्यायदेखील उपलब्ध आहेत.
-------------------------------------------------
मोत्याचे दागिने : दागिने म्हणजे प्रत्येक महिलेचा आवडता विषय. त्यामुळे सणाचा गोडवा वाढविणाऱ्या रक्षाबंधनाला मोत्याचे दागिने भेटवस्तू देऊ शकता. सध्या साडीवर मोत्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे मोत्याचे दागिने भेटवस्तू दिले तर नक्कीच आवडेल.
------------------------------------------
योगा मॅट : दैनंदिन जीवनामध्ये महिलांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. विविध जबाबदाऱ्यांमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यायामासाठी योगा मॅटदेखील गिफ्टचा पर्याय आहे.
----------------------------------------------
चॉकलेट : प्रत्येकाला गोड पदार्थ आवडतात. त्यामुळे बाजारात वेगवेगळे चॉकलेट, कॅडबरी बहिणीला भेट देऊ शकता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92252 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..