नेवाळपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी संकुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेवाळपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी संकुल
नेवाळपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी संकुल

नेवाळपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी संकुल

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ अंतर्गत असलेल्या प्रसाद चिकित्सा संस्थेच्या माध्यमातून नेवाळपाडा येथे शालेय मुलांसाठी अद्ययावत संकुल उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच पार पडले. याप्रसंगी सरपंच, शाळा केंद्रप्रमुख, गुरुदेव सिद्धपीठ व प्रसाद चिकित्सा पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संकुलामध्ये मुला-मुलींसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था, पाण्याची टाकी व नळ, हात धुण्यासाठी वॉश बेसिन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा या बाबींची सोय करण्यात आली आहे.

या शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून गरीब आदिवासी समाजातील सुमारे ५० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शौचालय व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. प्रसाद चिकित्सा संस्थेने तानसा खोऱ्यात आरोग्य सुविधेबरोबरच पिण्याचे पाणी व स्वच्छता यावर गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. हागणदारीमुक्त गाव या कार्यक्रमातंर्गत सुमारे नऊशे घरांना शौचालय बांधणीसाठी साह्य करण्यात आले. शाळांसाठी नवीन शौचालयाची उभारणी व नादुरुस्त शौचालयांची पुनर्बांधणी, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदणे व जीर्ण विहिरींचे नूतनीकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण संचाचे वाटप, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी शोषखड्डा असे विविध उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92255 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..