अमृत महोत्सवाच्या रॅलीने अभ्युदय नगर दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत महोत्सवाच्या रॅलीने अभ्युदय नगर दणाणले
अमृत महोत्सवाच्या रॅलीने अभ्युदय नगर दणाणले

अमृत महोत्सवाच्या रॅलीने अभ्युदय नगर दणाणले

sakal_logo
By

शिवडी, ता. १० (बातमीदार) ः स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची रॅली मंगळवारी अभ्युदय नगर परिसरात काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहायक पोलिस आयुक्त कल्पना गाडेकर सहभागी झाल्या होत्या. या वेळी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याच्या कार्यप्रणालीची ओळख प्रत्यक्ष भेट घडवून करून देण्यात आली. या वेळी व्यसनमुक्ती आणि सायबर गुन्हे याविषयीची माहितीही दिली. या उपक्रमात हर्षवर्धन गुंड, सुदर्शन चव्हाण, नंदकिशोर जाधव, शबनम मुजावर, संतोष जाधव, गणेश शेट्ये आदी पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते; तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्‍योती राणे, पर्यवेक्षिका रमा कारळे, कला शिक्षिका रेश्मा नलावडे, क्रीडा शिक्षिका वीणा शेलटकर, शिक्षिका दीपाली दराडे, मनीषा पालव आणि शिक्षकवर्ग, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92269 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..