अग्निशमनच्या जवानांसाठी सुसज्ज व्यायामशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमनच्या जवानांसाठी सुसज्ज व्यायामशाळा
अग्निशमनच्या जवानांसाठी सुसज्ज व्यायामशाळा

अग्निशमनच्या जवानांसाठी सुसज्ज व्यायामशाळा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : अग्निशमन दलातील जवानांना कायम सतर्क रहावे लागते. आपत्ती काळात या जवानांना केव्हा, कुठे जावे लागते, याचा नेम नसतो. त्यामुळे सतत धावपळीचे जीवन जगणाऱ्या या जवानांच्या सुदृढ आरोग्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाचही अग्निशमन केंद्राच्या आवारात ४५ लाखांचा निधी खर्च करत सुसज्ज व्यायामशाळा उभारल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेकडे सुरुवातीला फक्त वाशी आणि सीबीडी हे दोनच अग्निशमन दलाचे केंद्र होते. मात्र, शहराचा झपाट्याने विस्तार झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने वाशी, नेरूळ, सीबीडी, कोपरखैरणे आणि ऐरोली या पाच ठिकाणी अग्निशमन दलाच्या भव्य अशा इमारती उभारल्या आहेत. या इमारतीत अग्निशमन दलातील जवानांच्या निवासाची सोय आहे. तसेच जवानांना नियमित व्यायामासाठी सर्व अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये व्यायामशाळेसाठी जागादेखील राखीव ठेवण्यात आली होती; पण अग्निशमन दलाच्या केंद्रात जवानांसाठी व्यायामशाळा नसल्यामुळे त्यांना खासगी जिममध्ये जावे लागत होते. मात्र कामाच्या व्यापामुळे हे शक्य होत नसल्यामुळे अखेर महापालिकेने पाचही अग्निशमन दल केंद्राच्या आवारात सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने जवानांचा वेळ व पैशांचा अपव्यय थांबणार आहे.
---------------------------------------------
अग्निशमन दलातील जवानांचे आरोग्यासाठी त्यांना अग्निशमन दलाच्या केंद्रातच व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाचही केंद्रामध्ये व्यायामशाळा उभारण्यात आल्या आहेत. येथे सर्व प्रकारचे अत्याधुनिक साहित्य असून लवकरच या सुसज्ज व्यायामशाळेचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.
- शिरीष आरदवाड, सहशहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92271 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..