मालवणीत तिरंग्यांनी सजला ताजिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीत तिरंग्यांनी सजला ताजिया
मालवणीत तिरंग्यांनी सजला ताजिया

मालवणीत तिरंग्यांनी सजला ताजिया

sakal_logo
By

मालाड, ता. १० (बातमीदार) ः स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर मोहरमच्या निमित्ताने मालवणीत ताजिया तिरंग्याच्‍या रंगाने रंगला होता. मोहरम इस्लाम धर्मीय लोकांसाठी खूप महत्त्वाचा महिना असतो. हजरत इमाम हुसेन हे प्रेषित मोहम्मद यांचे धाकटे नातू होते. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ मोहरम महिन्याच्या दहाव्या दिवशी मुस्लिम समाज शोक पाळतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात ताजियाची मिरवणूक काढून त्याचे दफन केले जाते. या प्रसंगी मालवणीची वाहतूक संपूर्ण बंद झाली होती. मागील लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जुलूस निघाले. त्यामुळे मालवणीत येणाऱ्या सर्व मार्गांवरच्या बेस्ट बसेसला मालवणी नंबर १ येथे थांबवून परत रवाना करावे लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92282 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..