मिठाईवर ''बेस्ट बीफोर''चा विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिठाईवर ''बेस्ट बीफोर''चा विसर
मिठाईवर ''बेस्ट बीफोर''चा विसर

मिठाईवर ''बेस्ट बीफोर''चा विसर

sakal_logo
By

मिठाईवरील ‘बेस्ट बीफोर’ला तिलांजली
नवी मुंबईतील दुकानदारांना विसर; सणासुदीत आरोग्याला धोका
वाशी, ता. १० (बातमीदार) ः अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खुल्या मिठाईवर ‘बेस्ट बीफोर’ची तारीख टाकणे बंधनकारक केले आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विक्रेत्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली होती. मात्र, आता नवी मुंबईमधील दुकानांमध्ये या नियमाला डावलून मिठाईची विक्री होत असल्याने सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीचा धोका वाढला आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबईत मिठाईची सुमारे दोनशे ते अडीचशे दुकाने आहेत. या दुकानांमध्ये खुल्या मिठाईवर बनविण्याच्या तारखेसह ती कधीपर्यंत वापरावी, याचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांच्या बैठका घेऊन याबाबतच्या सूचनाही केल्या होत्या. सुरुवातीला काही महिने दुकानांमध्ये मिठाईवर ‘बेस्ट बीफोर’चे लेबल लावले जायचे; परंतु गेल्या काही दिवसांपासून दुकानांमधून हे लेबल गायब झाले आहेत. शहरातील मोठ्या व प्रसिद्ध दुकानांमध्ये या नियमांचे पालन होताना दिसते; परंतु अडगळीत असलेली काही मिठाईची दुकाने, बेकऱ्यांमध्ये या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याला धोका वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------------------------
मिठाईवर ‘बेस्ट बीफोर’ टाकणे बंधनकारक आहे. याबाबत जनजागृतीदेखील केली आहे. तसेच पथके नेमून कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92285 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..