वाढवण समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
वाढवण समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

वाढवण समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

डहाणू, ता. १० (बातमीदार) : वाढवणजवळ समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या वाढवण टीघरेपाडा येथील संदीप पांडुरंग पाटील (४२) हे वादळीवारे आणि पावसामुळे उसळलेल्या लाटांच्या प्रचंड तडाख्याने समुद्राच्या प्रवाहात ओढले गेल्याने बुडून मृत्यू झाला, पण त्यांचा मृतदेह अद्यापही हाती लागलेला नाही.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संदीप पाटील आणि त्याचा चुलत भाऊ मनोहर पाटील हे दोघे समुद्रात दुपारी तीनच्या सुमारास मासे पकडण्यास गेले होते. पाण्यात जाळी टाकण्यासाठी संदीप पाण्यातून जाळी घेऊन पुढे गेला, तर त्याच्या साथीला गेलेला त्याचा चुलत भाऊ मनोहर मागे राहिला होता. त्यावेळी एका प्रचंड मोठ्या लाटेने दोघांनाही समुद्राच्या प्रवाहात ओढून घेतले. त्यावेळी संदीप हा समुद्राच्या प्रवाहात वाहत जाऊन गायब झाला, तर मनोहर एका दगडाच्या आधारे कसाबसा पाण्याबाहेर पडला. संदीपचा शोध घेण्यासाठी वाणगाव पोलिसांनाही पाचारण करण्यात आले, पण बुधवार दुपारपर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92291 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..