बेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण
बेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण

बेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १० (बातमीदार) ः मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’बसला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पोस्ट खात्याकडून विशेष गौरव करण्यात येऊन बेस्टच्या सन्मानार्थ विशेष कव्हरचे लोकार्पण केले. हा कार्यक्रम मुंबईतील जीपीओ येथे झाला.
७ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई महापालिकेने बेस्टची निर्मिती केली. तेव्हापासून ७ ऑगस्ट हा दिवस ‘बेस्ट डे’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने ७ ऑगस्ट रोजी बेस्टच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ एक विशेष कव्हर जारी केले. यावेळी पोस्टल सेवा (मुख्यालय) महाराष्ट्र सर्कलचे संचालक अभिजित बनसोडे, बेस्‍टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, सहाय्यक महाव्यवस्थापक आर. आर. दुबल आणि सहाय्यक महाव्यवस्थापक एन. एम. हेर्लेकर यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92311 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..