रक्षाबंधनासाठी एनएनएमटीच्या ४०० गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्षाबंधनासाठी एनएनएमटीच्या ४०० गाड्या
रक्षाबंधनासाठी एनएनएमटीच्या ४०० गाड्या

रक्षाबंधनासाठी एनएनएमटीच्या ४०० गाड्या

sakal_logo
By

वाशी, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबईसह उपनगरातील प्रवाशांसाठी रक्षाबंधननिमित्त एनएमएमटीने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार कर्जत, खोपोली, बदलापूर, मुंबई, पनवेल येथील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रवासी सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने दैनंदिन संचलनात असलेल्या ४०० गाड्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी धावणार आहेत. त्यात मुख्यत्वेकरून गर्दीच्या बसस्थानक असलेल्या पनवेल, कर्जत, खोपोली, रसायनी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या ठिकाणांसाठी ही सेवा दिली जाणार आहे. यासाठीचे नियोजन करताना प्रशासनाने वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या असून एनएमएमटीच्या महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानकांवर आणि बस थांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शन आणि वाहतूक नियंत्रणासाठी अन्य अधिकारी आणि कर्मचारीही नेमण्यात आले असल्याची माहिती एनएमएमटीच्या वाहतूक विभागाने दिली आहे.

ठाणेकरांसाठी विटावापर्यंतच सेवा
कळवा येथील खाडीपुलावर रक्षाबंधनाच्या दिवशी जत्रा भरत असल्यामुळे विटावाच्या पुढे एनएमएमटीची वाहने सोडण्यात येणार नाहीत. त्यामुळे ठाण्याची वाहने ही कर्जत, खोपोली, बदलापूरच्या मार्गावर सोडण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92315 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..