विजेच्या खेळखंडोबामुळे जव्हार ‘नॉट रिचेबल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या खेळखंडोबामुळे जव्हार ‘नॉट रिचेबल’
विजेच्या खेळखंडोबामुळे जव्हार ‘नॉट रिचेबल’

विजेच्या खेळखंडोबामुळे जव्हार ‘नॉट रिचेबल’

sakal_logo
By

जव्हार, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यात पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणे हे नित्याचेच झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाला की मोबाईल टॉवरला होणारा पुरवठा बंद होतो. परिणामी मोबाईलचे नेटवर्कही गायब होत असल्याचा अनुभव जव्हारवासीय घेत आहेत. तसेच विजेअभावी दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होत आहे.
जव्हारला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात डहाणू तालुक्यातील गंजाड उपकेंद्रातून वीज पुरवली जाते. यासाठी जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून विजेचे वहन करण्यात येते. पण विजेचे वहन करणाऱ्या वाहिनी या जंगल, डोंगरदऱ्यांत आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस, वारा अशा अनेक कारणांमुळे विद्युत वाहिनी किंवा विद्युत पोल तुटल्याच्या घटना घडतात. दुर्गम भाग असल्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारा किंवा पोल दुरुस्तीसाठी अनेक दिवस लागतात. परिणामी जव्हारचा वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहारांना फटका बसतो. तसेच मोबाईल टॉवरला वीजपुरवठा न मिळाल्याने या परिसरातील मोबाईलचे नेटवर्कही गायब होते.


जव्हार तालुक्याला होणारा विद्युत पुरवठा हा डहाणू येथील गंजाड उपकेंद्रातून होत असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारे काही दुरुस्ती करायची असल्यास एका विशिष्ट भागातील विद्युत पुरवठा खंडित करून ते काम केले जाते.
- विवेक तळणीकर, उपअभियंता, महावितरण, जव्हार

विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर इंटरनेट जाणे, मोबाईलची रेंज जाणे यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही समस्या दूर होईल आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यात येईल.
- श्रीकांत सामला, मोबाईल कंपनीचे अधिकारी

मी मोबाईलचे एका वर्षाचे आगाऊ रिचार्ज केले आहे; पण मोबाईल कंपनीकडून सुविधा देण्यात असमर्थता मिळत आहे. मला याचा नाहक त्रास जाणवत आहे.
- रुपाली पाटील, ग्राहक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92336 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..