अभ्‍यासाचा प्रश्‍न सुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्‍यासाचा प्रश्‍न सुटला
अभ्‍यासाचा प्रश्‍न सुटला

अभ्‍यासाचा प्रश्‍न सुटला

sakal_logo
By

शिवडी, ता. १० (बातमीदार) ः दक्षिण मुंबईतील चर्नी रोडमधील सर्वात जुनी अभ्यासिका म्हणून ओळखली जाणारी स. का. पाटील अभ्‍यासिका अखेर सुरू झाल्‍याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. परीक्षेच्‍या हंगामात ही अभ्‍यासिका बंद असल्‍याने विद्यार्थी वर्गात चिंता पसरली होती. ‘सकाळ’ने या संदर्भात वृत्त देताच त्‍वरित कारवाई होऊन ही अभ्‍यासिका खुली झाली आहे.
ही अभ्‍यासिका मोफत असल्‍याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आदी भागांतून गरीब विद्यार्थी येथे येतात. गेल्या महिन्यात या अभ्यासिकेच्या एका बाजूची इमारत धोकादायक झाल्याचे सांगून ती तोडण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना आठ दिवसांत धोकादायक पहिल्या मजल्याची इमारत तोडून पुन्हा अभ्यासिकेमध्ये बसायला देऊ, असे सांगण्यात आले होते; परंतु महिना उलटून गेला तरीही इमारत तोडण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यात ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता पसरली होती.
याची दखल घेऊन ‘सकाळ’मध्ये ''विद्यार्थी अभ्यासाच्या चिंतेत'' या शीर्षकाखाली मंगळवारी (९ ऑगस्ट) वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या सी विभागाला जाग आली असून त्यांनी तात्काळ येथील इमारत तोडून त्याचे डेब्रिज हटवून विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत असून अभ्यासाबाबतची चिंता मिटली आहे.

विद्यार्थी वर्गाने मानले आभार
या अभ्यासिकेमध्ये दररोज १०० ते १५० विद्यार्थी रोज अभ्यास करत असतात. या महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), बँकिंग, रेल्वे, मंत्रालय क्लार्क, बीकॉम, सीए, आशा अनेक परीक्षा जवळ आल्या असल्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यास करायला जागा नसल्याने विद्यार्थी हतबल झाले होते. विद्यार्थ्यांची अभ्यासाबाबतची चिंता लक्षात घेऊन ‘सकाळ’मध्ये ''विद्यार्थी अभ्यासाच्या चिंतेत'' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या सी विभागाला जाग आली. त्यांनी तात्काळ येथील इमारत तोडून त्याचे डेब्रिज हटवून विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांकडून ‘सकाळ’चे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92343 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..