ठाण्यात नारळी पौर्णिमेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात नारळी पौर्णिमेचे आयोजन
ठाण्यात नारळी पौर्णिमेचे आयोजन

ठाण्यात नारळी पौर्णिमेचे आयोजन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. १० : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरात यंदाही नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही चेंदनी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने मीठबंदर रोड येथील क्लस्तम जेट्टी विसर्जन घाट या ठिकाणी नारळी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेले दोन वर्ष कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी झालेली नारळी पौर्णिमा यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी मासेमारी सुरू करण्यापूर्वी दर्या राजाला शांत करण्याकरता आगरी कोळीबांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मानाचा नारळ समुद्राला अर्पण करतात. यानिमित्त ठाण्यात यंदाही नारळी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. कळवा खाडीजवळ ही कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी पालिका प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे व चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे आयोजित नारळी पौर्णिमा उत्सव यंदा उत्साहात होणार आहे. या उत्सवात कोळी बांधव पारंपरिक वेष घालून बुधवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढणार आहेत. मिरवणुकीतून वाजत गाजत कोळी बांधव खाडी किनारी जाऊन पूजा करून दर्याला नारळ अर्पण करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92344 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..