मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून दीड लाख तिरंग्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून दीड लाख तिरंग्यांचे वाटप
मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून दीड लाख तिरंग्यांचे वाटप

मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून दीड लाख तिरंग्यांचे वाटप

sakal_logo
By

भाईंदर, ता.१० (बातमीदार) : स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमासाठी मिरा भाईंदर महापालिकेकडून आतापर्यंत सुमारे दीड लाख तिरंग्यांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात एकंदर अडीच लाख तिरंग्यांचे वाटप करणाचे उद्दीष्ट महापालिकेने ठेवले आहे.
हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून तिरंग्याचे वाटप करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा नागरिकांशी दररोजचा संपर्क असल्यामुळे राजकीय पक्षांनी महापालिकेकडून जास्तीत जास्त तिरंग्यांची खरेदी करुन ते नागरिकांना वाटावे असे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार राजकीय पक्षांकडून तिरंग्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. महापालिकेने केंद्र सरकारच्या केंद्रीय भंडार विभागाकडून ६० हजार आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून दीड लाख झेंड्यांची खरेदी केली. हे सर्व झेंडे महापलिकेची कार्यालये, प्रभाग कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही झेंड्यांचे वाटप मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून केले जात आहे.
या उपक्रमात महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार ९ ऑगस्टला सर्व शाळांमध्ये एकाच वेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले, १० ऑगस्टला महापालिकेच्या धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व विपश्यना केंद्रातील सभागृहात देशभक्तीवरील गाण्यांचा संगीत संध्या हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ११ ऑगस्टला शाळा महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, महापालिका कार्यालयांची स्वच्छता, पुरातत्व दृष्ट्या महत्त्वाच्या वारसा स्थळांची स्वच्छता, १२ ऑगस्टला वृक्षारोपण, महापालिका मुख्यालयात शासनमान्य लामणदिवा प्रज्वलन, १३ ऑगस्टला महापालिका क्षेत्रातील स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांची छायाचित्रे व माहितीचे प्रदर्शन, १४ ऑगस्टला घोडबंदर किल्ला व जंजीरे धारावी किल्ला, चिमाजी अप्पा स्मारक या ऐतिहासिक स्थळांची माहिती, हुतात्मा स्मारकासमोर रांगोळी दिव्यांची रोषणाई यासह स्वातंत्र्यदिनी प्रभातफेरी आदीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान महापालिका क्षेत्रातील उड्डाणपुल, नगरभवन, महापालिका मुख्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92351 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..