नोकरीच्या प्रलोभनाने चार लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीच्या प्रलोभनाने चार लाखांची फसवणूक
नोकरीच्या प्रलोभनाने चार लाखांची फसवणूक

नोकरीच्या प्रलोभनाने चार लाखांची फसवणूक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १० ः कल्याणमधील एका नोकरदाराला मोठ्या पदावरील नोकरीचे प्रलोभन दाखवून दोघा भामट्यांनी चार लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विशाल शर्मा व कृष्णा रामाराव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील न्यू सिद्धिरिद्धी पार्क सोसायटीत राहणारे योगेश चेऊलकर (वय ४५) यांच्याशी २०२१ मध्ये जुलै महिन्यात विशाल आणि कृष्णा यांनी योगेश यांच्याशी संपर्क साधत त्यांना जॉब्स लाईव्ह डॉट कॉम या कन्सल्टिंग कंपनीतर्फे सीनिअर मॅनेजर पदाची नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवले. योगेश यांना ई-मेलद्वारे सर्व माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून सहा हजार ५०० रुपये रजिस्ट्रेशन फी घेण्यात आली. त्यानंतर त्यांचा ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेत पास झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्युमेंट पडताळणी फीच्या नावे त्यांच्याकडून १८ हजार ९०० रुपये ऑनलाईन घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यावरून सात वेळा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. अशा प्रकारे ४ लाख ९ हजार काढून घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92369 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..