लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनीस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनीस प्रतिसाद
लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनीस प्रतिसाद

लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनीस प्रतिसाद

sakal_logo
By

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’तर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देणाऱ्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असिलता नितीन राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंग्रजांच्या जोखडातून प्रसंगी प्राणांची आहुती देत, मायभूमी स्वतंत्र करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींच्या सशस्त्र लढ्यातील आठवणींना उजाळा देणाऱ्या या चित्रप्रदर्शनीतील सर्व छायाचित्रे अकोल्यातील दिवंगत जयंत सहस्रबुद्धे यांनी जमविलेली आहेत. या प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी असिलता राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या प्रदर्शनीद्वारे नागरिकांना स्वातंत्र्यसेनानींचा सचित्र इतिहास व परिचय करवून दिल्याबद्दल लोकमान्य सोसायटी व संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांचे विशेष आभार मानले. ९ ऑगस्ट क्रांती दिनाप्रसंगी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या पहिल्या मजल्यावर सुरू झालेले हे प्रदर्शन गुरुवार, ११ ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी मोफत व खुले राहणार आहे. नागरिकांनी या चित्रप्रदर्शनीचा लाभ घ्यावा व स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र उठावाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन `लोकमान्य सोसायटी` तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92374 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..