राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी
राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी

राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी

sakal_logo
By

७० ते ८० टक्के जादा विक्री
शिवडी (बातमीदार) ः अनेक जण रक्षाबंधनाचा सण पंधरा दिवस साजरा करतात. यंदाचा सण निर्बंधमुक्त असल्याने रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीही बाजारात राख्या घेण्यासाठी बहिणींनी गर्दी केली होती. १५ ते २० टक्क्यांनी राख्या महागल्या तरी उत्साह कमी झाला नव्हता. कोरोना निर्बंध हटल्याने सुमारे ७० ते ८० टक्क्याने ग्राहक वाढल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
मुंबईतील दादर, परळ, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर आदी घाऊक बाजारपेठेत राखीविक्रीवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. चिमुकल्यांमध्ये लायटिंगच्या राख्यांची क्रेझ होती. चंदनाच्या राखीलाही विशेष पसंती होती. राखी पौर्णिमा गुरुवारी (ता. ११) सकाळी ९.३५ वाजता सुरू होणार आहे. १२ ऑगस्ट सकाळी ७.१८ पर्यंत ती राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92377 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..