खड्डेमुक्तीसाठी बड्या कंपन्या मुंबईच्या रस्त्यावर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डेमुक्तीसाठी बड्या कंपन्या मुंबईच्या रस्त्यावर?
खड्डेमुक्तीसाठी बड्या कंपन्या मुंबईच्या रस्त्यावर?

खड्डेमुक्तीसाठी बड्या कंपन्या मुंबईच्या रस्त्यावर?

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या ४०० किलोमीटरच्या रस्त्यांसाठीच्या निविदा प्रक्रियेतील पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. १७ ऑगस्टला निविदापूर्व बैठकीचा टप्पा पार पडणार आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ४०० किमीच्या एकूण ५ हजार ८०० कोटींची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या कंपन्या निविदाप्रक्रियेत सहभागी होतील, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. २१ सप्टेंबर रोजी कोणत्या बड्या कंपन्यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

निविदापूर्व बैठकीत सहभागी कंपन्यांकडून प्रक्रियेतील अटी व शर्तींची शहानिशा करण्यासोबतच सूचना आणि शंकानिरसन करणेही अपेक्षित आहे. याआधीचा पालिकेचा मोठ्या कंपन्यांबाबतचा अनुभव तितकासा चांगला नाही; पण यंदा एकत्रित पाच निविदा काढण्यात येत असल्यानेच कोणत्या बड्या कंपन्या सहभागी होतात हे काही दिवसांतच कळेल. त्यामुळेच मुंबईकरांचे रस्ते खड्डेमुक्त होणार की नाही, याचे भवितव्य ठरेल.

मुंबईत आतापर्यंत ९९० किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. २०२२-२३ मध्ये २३६ किमीच्या रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटींच्या रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा एकत्रित मागवल्याने त्यासाठी नामांकित आणि मोठ्या अशा राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या कंपन्या सहभागी होतील, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘मेकनाईज स्लीप फॉर्म पेवर’ अशा अत्याधुनिक संयंत्राचा वापर करून कमीत कमी कालावधीत रस्ते उभारणी अपेक्षित आहे. सर्वोत्कृष्ट दर्जाची रस्तेबांधणी करण्याची अट निविदेत घालण्यात आली आहे. संयुक्त काम करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

- काँक्रीटचे प्रस्तावित रस्ते ः ४०० किमी
- शहर भागातील रस्ते ः ७१ किमी (अपेक्षित खर्च ः १,१९४ कोटी)
- पूर्व उपनगरातील रस्ते ः ७० किमी (अपेक्षित खर्च ः ८११ कोटी)
- पश्चिम उपनगरातील रस्ते ः २७५ किमी (अपेक्षित खर्च ः ३,८०१ कोटी)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92383 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..