खड्यांविरोधात मनसेचा वसई विरार पालिकेवर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्यांविरोधात मनसेचा वसई विरार पालिकेवर मोर्चा
खड्यांविरोधात मनसेचा वसई विरार पालिकेवर मोर्चा

खड्यांविरोधात मनसेचा वसई विरार पालिकेवर मोर्चा

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेने आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी यावेळी महापालिका उपायुक्तांसमोर खड्डे बुजविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. तसेच महापालिकेने १६ कोटी रुपये खड्ड्यांना भरण्यासाठी तरतूद केली, तरीही हे खड्डे का भरले जात नाहीत, असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत. यावेळी उपायुक्तांना खड्ड्यांचे फोटो असलेली फ्रेम देण्यात आली; तर गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे न भरल्यास अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यात टाकू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. या मोर्चात अविनाश जाधव यांच्यासह तालुकाप्रमुख प्रफुल पाटील, जयंत पाटील व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92399 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..