खरी शिवसेना आमच्या सोबत ः फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरी शिवसेना आमच्या सोबत ः फडणवीस
खरी शिवसेना आमच्या सोबत ः फडणवीस

खरी शिवसेना आमच्या सोबत ः फडणवीस

sakal_logo
By

ठाणे, ता. ११ ः महाराष्ट्रात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करत आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता; पण आज परस्थिती बदली असून खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी ही कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, असेही फडणवीस म्हणाले. ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदसोबत सत्ता स्थापन केली. यावर भाजपचे नेते सुशील मोदी यांनी टीका केली होती. जे पक्ष भाजपला धोका देतात त्यांचे काय होते हे महाराष्ट्रात सर्वांनी पाहिले आहे, असे ते म्हणाले होते. याबाबत फडणवीस यांना विचारले असता बिहारमध्ये आमचे जास्त आमदार निवडून येऊनही आम्ही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92402 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..