उल्हासनगरात मोहरम निमित्त जुलूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात मोहरम निमित्त जुलूस
उल्हासनगरात मोहरम निमित्त जुलूस

उल्हासनगरात मोहरम निमित्त जुलूस

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) ः उल्हासनगर येथे मोहरमनिमित्त मंगळवारी (ता. ९) जुलूस काढण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह हिंदू-मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. शहाड फाटक नामदेववाडी येथून या जुलूसची सुरुवात झाली. गुलशन नगर मार्गे हा जुलूस उल्हास नदीवर येऊन थांबला. येथे ताजिया आणि ताबूतचे विसर्जन करण्यात आले.
जुलूसमध्ये माजी आमदार पप्पू कलानी, मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, बिंदर पा, मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष गणेश मढवी, उपविभाग अध्यक्ष विठ्ठल मोरे, शाखा अध्यक्ष अमित सिंग, पियुष वाघेला यांच्यासह इतर पक्षातील मान्यवर सहभागी झाले होते. मोहरम हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम भाविक या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. इस्लाममध्ये रमजाननंतर मोहरम महिन्याला खूप महत्त्व असल्याची माहिती मुस्लिम नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मैनुद्दीन शेख यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92408 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..