ब्राह्मणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाली बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाली बस
ब्राह्मणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाली बस

ब्राह्मणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाली बस

sakal_logo
By

वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरात बससेवा नसल्याने या परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे या परिसरासाठी बससेवा सुरू करा, अशी मागणी शिवसेनेने वाडा आगारप्रमुखांकडे केली होती. त्याची दखल घेत बुधवारपासून या परिसरात सकाळची बससेवा सुरू करण्यात आली आहे.
तालुक्याच्या ब्राह्मणगाव परिसरातील आंबिवली, सावरोली, कुमदळ, रायसल, सुपोंडे, म्हसरोली, वडपोली, कुर्झे, कडी या गावातील अनेक विद्यार्थी वाडा येथे शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. ही गावे मुख्य मार्गांपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहेत. तसेच या परिसरात बसची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटर पायी येऊन मग तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी बस पकडावी लागत होती. त्यामुळे या परिसरासाठी सकाळी व दुपारी शाळेच्या वेळेत बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख नीलेश गंधे यांनी वाडा आगारप्रमुखांना एका निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत वाडा आगाराने सकाळच्या सुमारास बससेवा सुरू केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92416 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..