पर्यावरणपुरक बाप्पा भक्तांचे आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपुरक बाप्पा भक्तांचे आकर्षण
पर्यावरणपुरक बाप्पा भक्तांचे आकर्षण

पर्यावरणपुरक बाप्पा भक्तांचे आकर्षण

sakal_logo
By

घणसोली, ता. १० (बातमीदार) ः गणेशोत्सवाला अवघे २० दिवस राहिले असून गणपती कला केंद्रात भक्तांची वाढती गर्दी पाहायला मिळत आहे. विविध प्रकारच्या गणेशमूर्ती यंदा बाजारात उपलब्ध असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ‘वृक्ष गजानन’ ही नवी संकल्पना आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे अतिशय सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा मात्र राज्य सरकारने निर्बंध दूर केल्याने उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याची ओढ भक्तांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या ‘इको फ्रेंडली’ गणपतीकडे ग्राहकांचा कल असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी ‘वृक्ष गजानन’ ही नवी संकल्पना बाजारात पाहायला मिळत आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीसोबत एक पाट, वृक्ष लावण्यासाठीचा ट्रे आणि तुळशीचे रोप दिले जात आहे. शिवाय गणपतीच्या विसर्जनानंतर मूर्तीसोबत तुळशीचे रोप देण्यात येत असल्याने ही नवी संकल्पना आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92417 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..