साथीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साथीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
साथीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

साथीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत पालिका हद्दीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी साथीची लक्षणे दिसली, तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे विलगीकरण करावे, गर्दीत जाऊ नये, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यावर भर दिला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ जून २०२२ पासून स्वाईन फ्ल्यूचे ४८ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २२ रुग्ण हे उपचार घेत आहेत. २४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मृत रुग्ण सहव्याधीग्रस्त असून त्यात ८५ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच वसंत व्हॅली येथे स्वाईन फ्ल्यूचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले आहे. ही लस दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती व फ्ल्यू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस कोरोना लशीसोबत घेण्यात येऊ नये, तसेच कोरोना लस व स्वाईन फ्ल्यू लस यामध्ये किमान दोन आठवड्यांचे अंतर असावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो आणि यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी करणे आवश्यक ठरते, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92421 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..