आशा कार्यकर्त्यांचे कथोरेंसोबत रक्षाबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा कार्यकर्त्यांचे कथोरेंसोबत रक्षाबंधन
आशा कार्यकर्त्यांचे कथोरेंसोबत रक्षाबंधन

आशा कार्यकर्त्यांचे कथोरेंसोबत रक्षाबंधन

sakal_logo
By

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) ः रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला (ता. १०) मुरबाड तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांनी आमदार किसन कथोरे यांची त्यांच्या मुरबाड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना राखी बांधली. कथोरे यांनी उपस्थित आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कोरोना काळातील जनसेवेच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले.
या वेळी मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, मुरबाड पंचायत समिती सभापती स्वरा चौधरी, मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, भाजप मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, सरचिटणीस नितीन मोहपे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील, माजी सभापती दीपक पवार, माजी उपसभापती सीमा घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92424 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..