वाहनांची संख्या वाढल्याने समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनांची संख्या वाढल्याने समस्या
वाहनांची संख्या वाढल्याने समस्या

वाहनांची संख्या वाढल्याने समस्या

sakal_logo
By

कल्याण, ता. ११ (बातमीदार) ः कल्याण डोंबिवलीसहीत आजुबाजूच्या शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यास सरकारी यंत्रणा तोकडी ठरल्याने नागरिक खासगी वाहन खरेदीकडे वळले; मात्र आज शहरात अरुंद रस्ते, पार्किंग समस्या यामुळे अव्यवस्था बोकाळली आहे. तसेच, नागरिकांना वायू प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे.

कल्याण शहरात येताना शहाड पूल, वालधुनी पुल, पत्री पूल आणि दुर्गाडी पुलावरून प्रवास करावा लागतो. कल्याण डोंबिवली शहर आणि आजुबाजूच्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली. चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने नव्याने वसत असलेल्या शहरात अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली. त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडू लागली. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

आरटीओच्या अहवालानुसार दरवर्षी सरासरी ७६ हजार ७०७ नवीन वाहनांची नोंदणी शहरात होते. या एकूण वाहनांच्या तुलनेत ७२ टक्के दुचाकी वाहने आहेत. शहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर वाहने उभी राहत असल्याने दिवसभर स्टेशन परिसर आणि शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
---------
कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकास होत आहे. आगामी काळात वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. शहरात मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झटत लागावे लागत असून वाहतूक कोंडी जटिल झाली आहे. यावर सर्व राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणेने एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. अन्यथा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीती जाणीव सामाजिक संघटना अध्यक्ष प्रथेमश सावंत यांनी व्यक्त केली .
----------
आरटीओचा नवीन वाहनांच्या नोंदणी

२०१९ मध्ये दुचाकी - ५७०४८, कार - ९७६३ , रिक्षा , कॅबस, रिक्षा, बसेस, रुग्णवाहिका, ट्रॅक्स आदी १०,९५७ - एकूण ७७,७६८ वाहनांची संख्या

सन २०२० मध्ये दुचाकी - ५७, १३९ कार - ९६८१, रिक्षा, कॅबस, रिक्षा, बसेस, रुग्णवाहिका, ट्रॅक्स आदी ८,९०७ - एकूण ७५ ,७२७ वाहनांची संख्या

सन २०२१ मध्ये दुचाकी - ४७,०७४ कार - ११,१३०, रिक्षा, कॅब्स, रिक्षा, बसेस, रुग्णवाहिका, ट्रॅक्स आदी ३,५३३ - एकूण ६१,७३७ वाहनांची संख्या
सन २०२२ मध्ये दुचाकी - ४४,१५९ कार - १२,८०३, रिक्षा, कॅब्स, रिक्षा, बसेस, रुग्णवाहिका, ट्रॅक्स आदी ४,८२२ - एकूण ६९,७८४ वाहनांची संख्या

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92427 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..