कुणबी सेनेचे प्रांताधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी सेनेचे प्रांताधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
कुणबी सेनेचे प्रांताधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

कुणबी सेनेचे प्रांताधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

sakal_logo
By

पडघा, ता. ११ (बातमीदार) ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या वतीने भिवंडी प्रातांधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भगवान सांबरे यांनी दिली आहे. भात उत्पादन व्यवसाय वाचवण्यासाठी एकरी अनुदान द्या, केंद्र व राज्य शासनाकडून खरेदी भातावर बंद केलेला बोनस चालू करा, तानसा व भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊन रुजू झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्या, भाताला हमीभाव द्या, या व इतर प्रमुख मागण्यांसाठी कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (ता. १२) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांबरे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92431 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..