कौल हेरिटेज येथील उद्यानाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौल हेरिटेज येथील उद्यानाचे भूमिपूजन
कौल हेरिटेज येथील उद्यानाचे भूमिपूजन

कौल हेरिटेज येथील उद्यानाचे भूमिपूजन

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसईमधील कौल हेरिटेज सिटी येथील उद्यानाचा भूमिपूजन समारंभ वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. साडेतीन एकर जागेवर आणि जवळपास चार कोटी रुपयांचा खर्च होणाऱ्या या उद्यानात विविध सुविधा असणार आहेत. या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग बोर्ड, लहान-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अम्पिथिएटर, मुलांसाठी मैदान अशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उद्यानात ५०० चौ. मी.वर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मियावाकी वन निर्मिती करण्यात येणार आहे. वन निर्मितीसाठी अंदाजे २८ लाख ७५ हजार रुपये खर्च येणार आहे. उद्यानात तयार होणारे मियावाकी वन हे वसई-विरार पालिका क्षेत्रातील पहिले वन असणार आहे. सदरचे अद्ययावत उद्यान उभारण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार आणि कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कामाला लागले आहेत. उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, माजी सभागृह नेते फ्रॅंक आपटे डिसोजा, उपायुक्त नयना ससाणे, सहायक आयुक्त ग्लिसन गोन्साल्विस आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92451 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..