पान ४ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ४ पट्टा
पान ४ पट्टा

पान ४ पट्टा

sakal_logo
By

प्रभात फेरीतून सामाजिक संदेश
नवी मुंबई ः विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, देशनिष्ठा ही मूल्ये वृद्धिंगत होण्यासाठी स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत खारघरमधील कॉन्‍व्हेंट ऑफ जिजस ॲण्ड मेरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सीजेएम) आणि इंटरनॅशनल स्कूल संस्थेकडून प्रभातफेरी काढण्यात आली होती. सकाळी ९ वाजता निघालेल्या या रॅलीत शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी रॅलीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
मॉडर्न स्कूल वाशीत झळकला हर घर तिरंगा
वाशी ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांनी प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी व रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवला. या वेळी मॉडेल स्कूल, वाशीच्या प्रांगणातून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांचे गणवेश परिधान करून वाशीच्या सेक्टर ६ ते ७ मध्ये प्रभात फेरी काढली. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
़़़़़़़़
ऐरोलीमध्ये सायकल रॅलीतून प्रचार
वाशी ः नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाऊंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती. ऐरोलीतील नेवा गार्डनपासून सेक्टर १५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. २०० हून अधिक सायकलस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला होता. रॅलीमध्ये माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक अशोक पाटील, अंकुश सोनवणे यांच्यासह रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या रमेश शुक्ला या दिव्यांग सायकलपटूनेही सहभाग घेतला होता.

नेरूळमध्ये घरोघरी राष्ट्रध्वजाचे वितरण
नेरूळ (बातमीदार)ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. प्रशासकीय पातळीवर तसेच व्यक्तिगतरीत्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने जनसेवक गणेश भगत यांच्याकडून नेरूळ पश्चिमला सेक्टर १६, १६ ए, १८ परिसरात घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वितरण केले आहे. या वेळी ६०० हून अधिक सदनिकांमध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

कोकण कार्यालयात ध्वजचिन्हांचे वाटप
तुर्भे (बातमीदार) : स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते ध्वजचिन्हांचे वाटप करण्यात आले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १७ ऑगस्टदरम्यान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या वेळी कोकण विभागातील विविध कार्यालयांमार्फत समाजमाध्यमे, जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर, रॅलीतून जनजागृती करण्यात येत आहे.

उरणमध्ये ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रम
उरण (वार्ताहर) ः स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रम राबवले जात आहे. यानिमित्त शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबतचा एक सेल्फी घेऊन आपले पूर्ण नाव व पत्ता ९८७०९५५५०५ या व्हाटस ॲप क्रमांकावर पाठवून सन्मानपत्र प्राप्त करण्याचे आवाहन, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92460 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..