पोलादपुरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलादपुरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित
पोलादपुरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित

पोलादपुरमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित

sakal_logo
By

पोलादपूर, ता. ११ (बातमीदार)ः पोलादपूर शहरातील वीजपुरवठा दोन दिवसांपासून वारंवार खंडित होत असून विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलादपूर शहरात विजेची समस्या नित्‍याचीच आहे. सध्या वादळी पावसाचा जोर वाढल्‍याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्‍याने नागरिक हैराण आहेत. मंगळवारी रात्री बराच काळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली असून झोपेचे तीन-तेरा वाजले. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्‍यामुळे पुरवठा वारंवार खंडित होतो. मात्र आता दुरुस्‍तीचे काम करण्यात आले असून वीजपुरवठा सुरळीत आहे.
- सुनील सूद, उपकार्यकारी अभियंता, महाड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92462 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..