विक्रोळीत राष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रोळीत राष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन
विक्रोळीत राष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन

विक्रोळीत राष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. डॉक्टर सेल विभागाचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी हे आंदोलन झाले. यावेळी शंतनू शेळके, कुणाल पे, रफिक गाणी, रॉबिन राघवन, अनिकेत माने आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कन्नमवार तसेच स्टेशन परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहनचालक व नागरिकांना येथून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मागील महिन्यातच राष्ट्रवादीतर्फे याच खड्ड्यांविरोधात आंदोलन करत खड्ड्यांचे मोजमाप करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने सदर खड्डे बुजवलेदेखील होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावल्‍याने या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.
कन्नमवार येथील मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह, तसेच क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयाचे आयसीसीयू विभाग आहे. येथे जाताना रुग्णवाहिकेला खड्ड्यांतूनच जावे लागते. त्यामुळे प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना खूपच वेदना सहन कराव्या लागतात, असे डॉ. योगेश भालेराव यांनी सांगितले. पालिकेने तत्काळ खड्डे बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी डॉ. योगेश भालेराव, शंतनू शेळके यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92463 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..