सणासुदीला महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीला महागाईची झळ
सणासुदीला महागाईची झळ

सणासुदीला महागाईची झळ

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ११ (वार्ताहर) ः सणांचा महिना असलेल्या श्रावणात गोडधोड, उपवासाचे व पूजेसाठी प्रसादाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होताच पोहा, मुरमुरे, रवा, साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, काही महिन्यांपासून या वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असल्याने ऐन सणासुदीत महागाईची झळ बसत आहे.
कमी उत्पादन व कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोहे, मुरमुरे, रवा, मैदाच्या दरात वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर ही वाढ झाली असल्याचे पनवेल येथील किराणा दुकानदार व व्यापारी बोलत आहेत. नुकताच मुरमुरे, पोहे यांच्यावर जीएसटी आकारण्यात आला आहे. जीएसटीमुळे खाद्यपदार्थांच्या दरात पाच ते सात टक्केपर्यंत वाढ झाली आहे. तसेच कोरोनाकाळात अल्पदरात गव्हाचे वाटप करण्यात आल्याने धान्य महागल्याची माहिती व्यापारी देत आहेत. त्यामुळे घाऊक बाजाराप्रमाणे किरकोळ बाजारातही दरात मोठी वाढ झाली आहे.

कोट
श्रावण महिन्यात पोहे, मुरमुरे, रवा, मैदा यांना अधिक मागणी असते. श्रावणानंतर गणेशोत्सव, त्यानंतर दिवाळी या काळात सर्व प्रकारच्या मालाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. सध्या पुरवठा आणि मागणीमध्ये तफावतीमुळे दर चढे आहेत.
- बाळासाहेब सूर्यवंशी, किराणा दुकानदार, कळंबोली

घाऊक बाजारातील किरकोळ दर
वस्तू दर १ किलो
दगडी पोहा ३४ ते ३९
पातळ पोहा ४२ ते ४६
मुरमुरे ४९ ते ५१
भडंग ७८ ते ८१

दर ५० किलो
भाजके पोहे ४१ ते ४३
रवा १५५० ते १६७५
सुजी १५५० ते १६७५
मैदा १५५० ते १७००

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92483 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..