दिघ्यात पदपथांवर अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघ्यात पदपथांवर अतिक्रमण
दिघ्यात पदपथांवर अतिक्रमण

दिघ्यात पदपथांवर अतिक्रमण

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगरपर्यंतच्या रस्त्यावरील पदपथावर अतिक्रमण करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे भंगारमाफियांनी पदपथांवरच अतिक्रमण केले असून या प्रकारामुळे पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे झाले आहे.
ठाणे बेलापूर मार्गावरील संजय गांधीनगर परिसरात भंगारमाफियाने रस्त्यालगतच हॉटेल आणि जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. अशातच रस्त्यालगत लाकडाची वखार, मटणविक्रेते इतर व्यावसायिकांनीदेखील बिनधास्तपणे पदपथावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथील पदपथावरून चालणे पादचाऱ्यांना कठीण झाले असून या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीदेखील होत आहे. राजकीय वरदहस्तामुळे या अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
---------------------------------
संजय गांधीनगर येथे पदपथावर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
- महेंद्र संप्रे, सहायक आयुक्त, ऐरोली विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92487 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..