सावकारी कर्जाला कंटाळून जव्हारमध्ये युवकाची आत्महत्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावकारी कर्जाला कंटाळून जव्हारमध्ये युवकाची आत्महत्या?
सावकारी कर्जाला कंटाळून जव्हारमध्ये युवकाची आत्महत्या?

सावकारी कर्जाला कंटाळून जव्हारमध्ये युवकाची आत्महत्या?

sakal_logo
By

सावकारी कर्जाला कंटाळून जव्हारमध्ये युवकाची आत्महत्या?

जव्हार, ता. ११ (बातमीदार) ः जव्हार शहरात २७ वर्षीय कापड व्यापाऱ्याने धंद्यासाठी घेतलेल्या सावकारी कर्जाची परतफेड होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. जव्हार पोलिस याबाबत अधिक तपास करीत असून तरुणावर दबाव टाकणाऱ्या, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.
जव्हार शहरातील आत्महत्याग्रस्त वसीम फारूक मेमन (वय २७) याचे कापडविक्रीचा किरकोळ व्यवसाय होता. त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने व्याजावर काही रक्कम उचलली होती. या रकमेच्या भरमसाट व्याजाचे पैसे भरून तो कंगाल झाला होता. त्याला वारंवार कर्ज फेडण्यासाठी धमक्या येत होत्या. त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी केला आहे. बँक, पतपेढी, सहकारी बँकांतून मिळणारे कर्ज हे वार्षिक ८ टक्के ते १४ टक्के आहे. मात्र त्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करणे अवघड होत असल्याने अनेक जण सावकारी मार्ग स्वीकारतात. हे सावकार मग पिळवणूक करीत राहतात, असे जाणकार सांगतात. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92488 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..