आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसह तिरंग्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसह तिरंग्याचे वाटप
आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसह तिरंग्याचे वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंसह तिरंग्याचे वाटप

sakal_logo
By

मुंबई ः लहान मुले आणि आरोग्याच्या प्रश्नावर कार्यरत असणाऱ्या ‘साद फाऊंडेशन’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून दुर्गम भागातील आदिवासीबहुल शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हा आणि वाडा तालुक्यातील वारसाळे, मांगरूळ आणि उजैनी गावातील जिल्हा परिषद शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास सोबत खाऊचा पुडा आणि भारताचा तिरंगा झेंडा आदी साहित्य वाटपाचा कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी तिन्ही गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमात मोहिनी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, उद्योजक सुनील कनोई आणि अनिल कनोई, कपिल कनोई या कुटुंबीयांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविता आल्याचे साद फाऊंडेशनचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92499 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..